चविष्ट जग
By Mohana on मन मोकळे from mohanaprabhudesai.blogspot.com
अमेरिकेत आल्यावर गेली पंधरा वर्ष आवर्जून आम्ही वेगवेगळ्या देशातले पदार्थ खायला रेस्टॉरंट धुंडाळत असतो. सुरुवातीला सगळं काही रुपयात बदलून हिशोब करायचो पण जिभेचे चोचले पुरवताना हिशोब मोकळा सोडलेला असायचा.रेस्टॉरंटमध्ये आवडलेला पदार्थ घरी करुन बघायला फार गंमत वाटायची. पण त्यासाठी पाककृती मिळवणं पंधरा वर्षापूर्वी सोपं नव्हतं. पाककृती संकेत स्थळावर सहज उपलब्ध नव्हत्या. मग वाचनालयातून पुस्तकं, मासिकं आणून, प्रतिक्षालयात पडलेल्या अंकातून किंवा त्या त्या देशातील व्यक्तींना गाठून पाककृती मिळवायला लागायची.प्रथम जशास तशी, नंतर हळूहळू जिभेला अधिकाअधिक रुचेल त्याप्रमाणे पाककृतीत बदल केले. कोणत्या ना कोणत्या समारंभात किंवा कुणाच्या घरी खाल्लेला पदार्थ आवडला की तो करुन पाहिल्याशिवाय अजूनही चैन पडत नाही. त्यातूनच आत्तापर्यंत देशोदेशीचे खूप वेगवेगळे माझ्या स्वंयपाकघरात शिजले.बकलावा, ग्रील्ड मशरुम पास्ता, आरगुला बेझिल पेस्तो सॅडविच, स्पिनॅच पास्ता विथ ॲसपॅरगस पेस्तो, तिरामिसु असे वेगवेगळे पदार्थ केले की देशाबाहेर नव्याने पाऊल टाकणार्यांना ते आवडतात पण आधी कुठे खाल्लेले नसतात त्यामुळे नावंही माहित नसतात. मग ते कसे करायचे आणि साहित्य कुठे मिळेल असे प्रश्न पडतात. कृती ऐकली, सोपं आहे असं लक्षात आलं की करुन पहायचं असतं.मैत्रीणींना या पाककृती सांगताना, इ मेल करताना वाटलं की अमेरिकेत माझ्या चविष्ट जगात प्रवेश करुन, पाककृती मिळवून नव्याने आलेल्यांना पण हे पदार्थ करुन पाहता येतील. पहा करुन नक्की आणि मला सांगाही कसे झाले हे पदार्थ.हे माझं चविष्ट जग नक्की डोकावा त्यात’मोसम’ ला जसा प्रतिसाद दिलात तसाच या पदार्थांना मिळेल अशी अपेक्षा