चला, अजुन एक पुतळा उभारूया - प्रशांत असलेकर
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
फार जुनी नव्हे, जेमतेम वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. एक चालता बोलता पुरूषोत्तम या महाराष्ट्राच्या भूमीवर वावरत होता. थकला होता. भागला होता. विकलांग झाला होता. पार्कीन्सनने विद्ध होऊन शरपंजरी पडला होता. गुडघेदुखीने बेजार झाला होता पण त्याने कुणापुढेही गुडघे टेकवले नव्हते. अगदी राज्यकर्त्यांकडून सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारतानाही मनगटशाहीविरुध्द बोलण्याची धमक तो राखून होता. भले