गळ

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

जोगळेकर कुटुंब घरातल्या घरात एकत्र आलं आणि त्यांनी ’गळ’ टाकला म्हणजे ’गळ’ करण्याचा घाट घातला. खरंतर तो घाट घातला मीच पण गळ लावून त्यात सगळ्यांना ओढलं. नेहमीप्रमाणेच मी काही काम करायला सांगितलं की जसे सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलात तसंच झालं; विशेषत: नवर्‍याचं. त्याने तोच भाव ठेवून काम केलं आहे त्यामुळे अभिनय अगदी सहज आणि भूमिकेला साजेसा झाला आहे. लेकिने काय करेन ते एकाच ’शॉट’ मध्ये असंच आधी सांगितलं होतं त्यामुळे दिग्दर्शकाला कुणालाही ’वाकवण्याची’ संधीच मिळाली नाही. तरी मी सगळ्यांना म्हणत होते मानधन घ्या म्हणजे मुकाट माझं ऐकाल पण नाही; एका पैशाचीही अपेक्षा न बाळगता तिघांनी मला ’वाकवायची’ संधी सोडली नाही. तरी मी चिकाटीने हा ५ मिनिटांचा लघुपट केलाय. बघा आणि बेधडक मुलीला, नवर्‍याला नावं ठेवा. आता नेपोटीझमवाल्यांचं दु:ख कळलं. आमच्यासारख्यांचं फाफटीझम होतं घरातल्याच लोकांना काम दिलं (करायला लावलं) की. गमतीचा भाग सोडला तर खरंच माझ्या लेकिने खूप मन लावून काम आणि चित्रिकरण केलं आहे आणि नवर्‍याने नेहमीप्रमाणे हं, हू, बरं, नक्की असं तो नेहमी करतो तसंच इथेही उत्तम केलं आहे. लेकाने त्याचा आवाज चार चार वेळा आठवण करुन दिल्यावर लगेच दिला. या सगळ्या घाटात आमच्या मित्रमैत्रिणींनी उत्साहाने विचारल्याक्षणी उपस्थिती लावली आहे आणि अभिजय काणेने उत्कृष्ट पार्श्वसंगीत दिलं आहे. बघा तर आमचा ’गळ’.For my non Marathi Speaking friends: Mohana, Viren, Parnika and Rutvik have created a short film 'Lure' and it is with subtitles. Enjoy our family production. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!