गणपती मंदिर विश्रामबाग
By amolkelkar on धार्मिक from kelkaramol.blogspot.com
.सांगली नगरी आणि गणपती यांचे नाते अतुट आहे. पटवर्धन संस्थांचे गणेश मंदिर आणि हरिपूर रोड वरील बागेतला गणपती ही सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरे. एका गावात दोन प्रसिद्ध गणपती मंदिरे असण्याचा मान सांगली प्रमाणे पुणे नगरीला आहे कारण इकडे ही दगडुशेठ गणपती आणि सारसबाग किंवा तळ्यातला गणपती अशी दोन प्रसिद्ध गणपती देवस्थानं आहेत. इतर ठिकाणी मात्र एकाच शहरात दोन प्रसिध्द गणपती मंदिरं कमीच.सांगलीच्या उपनगरातील आणखी एका गणपती बाप्पांचे हे चित्र आहे साधरणपणे १९९५ नंतर अचानक प्रसिद्ध पावलेले हे गणेश मंदिरातील बाप्पा. शंभर फुटी रोडला विश्रामबाग या सांगलीतील उपनगरात असलेले हे मंदिर.अजुबाजूच्या परिसात असणा-या काॅलेजमधील कुमार/ कुमारिकांचे हे अल्पावधीत आवडते स्थान झाले आणि सांगलीला ३ रे प्रसिध्द गणेश मंदिर मिळाले.आमची विश्रामबागची रम्य सफर सुरु व्हायची ती या मंदिरातून आणि सांगता व्हायची ती पै प्रकाश किंवा सरोवरची ची भेळ खाऊन . हीच एकेकाळी आमच्यासाठी ऐश होती दर रविवारची विश्रामबागच्या या गजाननाची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच गणेश जयंती निमित्य प्रार्थना ????????देवा तुझ्या द्वारी आलो.माघ. शु.चतुर्थी४/२/२२www.kelkaramol.blogspot.com Loading...