क्लिनिकल ! (India vs Ireland - World Cup 2015)
By Ranjeet on कविता from www.ranjeetparadkar.com
सदतिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने केव्हिन ओ'ब्रायनचा चेंडू सीमापार टोलवला आणि आयर्लंडविरुद्धचा सामना भारताने जिंकला. हा जो विजयी फटका होता, तो फटका संपूर्ण सामन्याचं सार सांगत होता. त्या षटकातील सगळे चेंडू ओ'ब्रायन ऑफ स्टंपबाहेर टाकले. फक्त सहा धावा विजयासाठी हव्या होत्या, पण ह्या सहा धावा सहजासहजी द्यायच्या नव्हत्या म्हणून. पण कोहलीने काय केलं ? त्याने गोलंदाजाचा प्लान ओळखला आणि आधीच