क्रिमी टॅको बोटी

By Mohana on from globalfoodcooking.blogspot.com

साहित्य:३/४ कप नारळाचं दुध (मी कॅन मधलं वापरलं आहे)१/२ कप कंडेंन्स्ड मिल्क१/२ कप अननस रस१/४ चमचा मीठ२ चमचे कॉर्नस्टार्च१ अंड्यातील पिवळा बलक२ चमचे तूप१ पॅक टॅको बोट्स टॉरटिया१ कप व्हिप्ड क्रिम (ऐच्छीक)१ चमचा बदाम, भाजलेलं सुकं खोबरं कृती:नारळाचं दुध, कंडेंन्स्ड मिल्क, अननस रस, कॉर्नस्टार्च, मीठ आणि बलक (फेटून) एकत्र करुन मध्यम गॅसवर उकळवा. उकळवताना सतत ढवळत रहा. साधारण ३-४ मिनिटं लागतात. मिश्रण  घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा. किंचित गार झाल्यावर ढवळून फ्रिजमध्ये  कमीत कमी २ तास ठेवा.ओव्हन 375°F. वर गरम करा. कुकी शीटवर तुपाचा हात लावून सर्व बोटी ठेवा. ८ मिनिटं किंवा कडा तपकीरी होईपर्यंत भाजा. बाहेर काढून गार व्हायला ठेवा.प्रत्येक बोटीत वरील मिश्रण (२ चमचे) घालून वर बदामाचे तुकडे, भाजलेल्या खोबर्‍याचा किस भुरभुरावा. पाहिजे तर व्हिप्ड क्रिम घालू शकता. बोटी थिजू न देण्यासाठी लगेच खा :-)टीप: आंबटपणा नुसार अननसाचा रस कमी जास्त करु शकता तसंच कंडेंन्स्ड मिल्कचाही. टॉरटीयाच्या १ पॅकमध्ये १२ असतात. मिश्रण उरलं तर फ्रिजरमध्ये ३ आठवडे राहतं.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!