कुण्या एकाची सत्तागाथा (एक राजकीय विरहगीत )
By ramataram on मन मोकळे from https://ramataram.blogspot.com
राजकीय आखाड्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या विरोधी पक्षनेत्याशी असणार्या साट्यालोट्याबद्दल सतत कुजबूज होत असते. एका पंच पंच उष:काली दोघांनी बांधलेली गाठ ज्येष्ठांच्या आशीर्वादाअभावी सोडावी लागल्यानंतर त्यांच्यातील संबंधांबद्दल अधूनमधून वावड्या उठत असतात. त्यात कितपत तथ्य आहे ते त्या दोघांनाच ठाऊक. एक नक्की, भूतकालातील त्या आशादायी पहाटेची आठवण काढत त्यांच्यातील एक जण संध्याकाळी उदास फिरताना