कालातीत विचारवंत -- पिनाकीन गोडसे
By cooldeepak on साहित्य from https://cooldeepak.blogspot.com
शहर मेलबर्न. दिवस मे महिन्याचे. आमच्याकडे काही मैत्रिणी आल्या होत्या (पुणेकर नसल्याने तिसऱ्या वाक्यात हशा मिळवायची अट मला नाही). एकीने पुलंची पुस्तके बघून दुसरीला सांगितले की, "अरे हे फार विनोदी लेखक होते". मला कळेना की कीव कोणाची करावी माहिती देणारीची की माहिती जिला मिळाली तिची? की विनोदी लेखक एवढीच ओळख उरलेल्या पुलंची ? पण ते शब्द त्रास देत राहिले हे मात्र खरे. आधी एका लोकप्रिय कार्यक्रमात पु.