कटू सत्ये
By vaghesh on ललित from vinodnagari.blogspot.com
आयुष्यातील काही कटू सत्य ,???????????????????????? १. चांगले काम करायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा..मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची.. २. काही चेहरे मॉर्निंग वॉक ला जाण्यासाठी भाग पाडतात.. ३. काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.. ४. चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.."माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. ५. तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी..ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..६. मिसळ च्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला..corona ची किंचित ही भीती नसते..७. ज्यांच्या आयुष्यात कायमच्ं चढ उतार येतात..त्यांना ट्रेकिंग ला जायची गरज नसते..८. लग्नात.. मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही.. ९. आज कालच्या पोरा पोरींपेक्षा, संस्कारी तर मच्छर आहेत..सात च्या आतच्ं घरात येतात.. १०. ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते.. ११. जिथे मारामारी करणं शक्य नाही..तिथे टोमणे तरी मारूनच्ं यायचं.. सोडायचं नाही अजिबात.. १२. आयफोन वाल्यांच् अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं.. १३. वर्षभर DP न बदलणारे..जेव्हा २-२ दिवसात DP बदलतात..तेव्हा समजून जायचं.. की कोणीतरी नवीन "जेवलास का ?" ADD झाली आहे.. १४. पोट आणि ego कमी असेल तर..माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. १५. गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.."तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..?१६. भिंतीलाही कान असतात म्हणणाऱ्यांनो..तुम्ही ज्याच्यासोबत तुमचे सिक्रेट शेअर करता ना..तोच खरा पोस्टमन असतो.. १७. तुम्हाला जर तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखादं दिवशी फरशी पुसून बघा.. ज्ञान स्थगित..????????????????????????????