ओल्या केसानिशी
By pareshkale on मन मोकळे from pareshkale.blogspot.com
अशीच ये समोरी ओल्या केसानिशीमागितले काही तर म्हणू नको नाहीझाकला चेहरा कशाला या बटानीतरीच चांदणे अजून पडलेच नाहीपहात रहावे आर्जव डोळ्यातले मीमिठीत घेण्याचेही आज भान नाहीयेतेस जवळ काळसुद्धा स्तब्ध होतोशब्दांना बोलणे कसे ठाउक नाहीओलेता स्पर्श जाणवतो ओठांनाजागेपणी कधी असे घडलेच नाहीआठवता तू नेहमी का हरवून जातो वेंधळ्या मना स्वप्नी मी पाठवत नाही