एक येडचाप अभिनेता ..

By pramodm on from aaydiyachikalpana.blogspot.com

               रॉबर्ट डॉवनी ज्यू . माझ्या आवडत्या हॉलीवूड अभिनेत्यांपैकी एक. अर्थात जाणकारांच्या लेखी ही आवड अतिशय डीसेंट नसली तरी तो मला आवडतो . स्टबर्न , इगोस्टिक , आणि हायली इंटलेक्चुअल बास्टर्ड आणि तरीही या सर्वातून डोकावणारा एक फिलॅनथ्रोपिकल अॅप्रोच अशा प्रकारच्या भूमिका तो अगदी परफेक्टली रंगवतो किंबहुना जगतो म्हणायला काहीच हरकत नाही .     शेरलॉक होम्स मधील होम्स किंवा आयर्नमॅन मधला मल्टी बिलीनेअर इसेन्ट्रीक जीनियस टोनी स्टार्क या दोन्ही व्यक्तिरेखा ह्या मुळातच अतिशय बुद्धिमान आणि तेज आहेत या दोन्हीही भुमिकांवर डावनी ज्यू. ने आपली छाप सोडली आहे .           . शेरलॉक होम्स हे सर आर्थर कॉनन डॉयल यांचे अजरामर साहित्यिक पात्र . आणि अतिशय बुद्धीमान व चपळ असणारा आणि अतिशय तठस्थ किंवा अतिशय तर्कशुद्ध दृष्टीकोन ठेवून काम करणारा डिटेक्टिव शेरलॉक होम्स तर त्याने जिंदा केलाय . अर्थात त्यात दिग्दर्शकाचेही श्रेय आहेच पण त्याने केलेला होम्स हा अल्टीमेटच .                    अतिशय वादग्रस्त पूर्वाआयुष्य जगलेल्या डॉवनी ज्यू.ला शेरलॉक होम्स आणि आयर्नमॅन मूवी सेरीजनी हात दिला आणि पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणून उभे केले.  त्याची यापूर्वीची कारकीर्द ही तशी अतिशय उल्लेखनीय नव्हती आणि वाईटही नव्हती  पण ह्या दोन्ही मुव्हीजनी चित्र पालटून टाकले . आणि त्याला हॉलीवूड मधील अव्वल नायकांच्या श्रेणीत आणून बसवले .             मुळात डॉवनी ज्यू.चा जन्म हा एका चित्रपट क्षेत्राशी संबधित असलेल्या घरी झाला . त्याचे वडील डॉवनी सिनिअर. हे  अभिनेता ,दिग्दर्शक , पटकथाकर , छायाचीत्रकार अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करत होते . त्याची आईही याच क्षेत्राशी संबधित होती . त्यामुळे सिनेमाचं बाळकडू हे त्याला अगदी लहानपानापासूनच मिळालं .त्याने स्वतःही वयाच्या पाचव्या वर्षी आपली पहिली भूमिका केली . पण त्याला त्याच्या घरातून चांगले संस्कार मिळू शकले नाहीत . डॉवनी सिनिअरना ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते . त्यांच्यामुळे ज्यूनिअरही त्या व्यसनाला बळी पडला तेही जरा लवकरच म्हणजे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी . या व्यसनातून तो बाहेर पडण्याचा पर्यंत करत होता पण यश येत नव्हते .या व्यसनामुळे त्याच्या खासगी जीवनातही खूप उलाथापालथी झाल्या . ड्रग्ज सेवनाबद्दल जेलवारी ,  कोर्टाने फर्मावलेल्या शिक्षांमुळे घडलेल्या व्यसनमुक्ती शिबिरांच्या फेरया ह्या साऱ्या गोष्टीमुळे त्याचे कौटुंबीक जीवन अतिशय अस्थिर होते . त्याच्या ह्या ‘एक पाव जेल मे’ टाइप जीवनामुळे त्याचा घटस्फोट झाला .  पत्नी मुलाला घेऊन निघून गेली . पण त्यानंतर त्याच्या जीवनात आलेल्या नवीन पत्नीने त्याला व्यसनातून बाहेर पडायला मदत केली ; आणि त्याच्या करिअरला एक चांगला स्विंग मिळाला तो आयर्नमॅनच्या रूपाने . या दणदणीत व्यावसायिक यशाने त्याचा पुढचा मार्ग यशस्वी बनवला . अर्थात त्याचं व्यक्तिगत आयुष्य हे खूप निराशाजनक असलं तरी त्याच्यात असलेल्या गुणवत्तेमुळे त्याने खूपच मोठी व्यावसायिक मजल मारली .                           तो काही खूप ग्रेट वगैरे आहे असं नाही किंवा त्याच्यापासून खूप काही प्रेरणा वगैरे मिळते असंही काही नाही . मलाही त्याच्याविषयी खुप माहिती होती असं नाही .पण त्याची शैली आणि त्याने ज्यापद्धतीने शेरलॉक होम्स , आणि टोनी स्टार्क वठवला त्यामुळे त्याच्याविषयी एक कुतूहल निर्माण झालं . आणि त्यातून त्याच्या विषयी धुंडाळा घेतला . विकीपेडिया वर त्याच्या विषयी भरपूर ऐवज मिळाला .IMDB वरही माहिती मिळाली . तीच माहिती संकलित करून या पोस्ट मध्ये मांडलीय .                तो कितीही बेदरकर आणि बेफिकीर असला तरी त्याचे चाहते मात्र त्याच्या नवीन फिल्म्सची सदैव प्रतीक्षा करत असतात आणि त्यातच त्याचं यश सामावलेलं आहे . शेवटी एका कलाकाराला आणखी काय हवं असतं .                                                                      धन्यवाद  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 5
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!