आर्थीक स्थिरता यावी या साठी उपाय वैभवलक्ष्मी व्रत

By gmjyotish on from https://gmjyotish.blogspot.com

हरी ऒम, नमस्कार ज्योतिषप्रेमी मित्रांनो, आर्थिक प्रश्न व त्यावरील उपाय म्हणून आपण कार्तिकस्वामी पुजन हा हा उपाय यावर्षी १२ नोव्हेंबरला २०१९ला आहे. या दिवशीकृतिका नक्षत्र नाही म्हणूनपुजा करायची असे नाही. कार्तिकमहिन्यात पोर्णिमेला कार्तिकस्वामी पुजन करावे अशीपरंपरा आहे.याचीसर्व माहिती आपल्याला याव्हिडीओ मधे मिळेल. हा व्हिडीओमागील वर्षी प्रसिध्द केलेलाआहे त्यामुळे यामधीलतारीख बदलली आहे याचीनोंद घ्यावी.https://www.youtube.com/watch?v=xuJ60k1q4Oo&t=10s तो का करायचा याची कारणमिमांसापण जाणून घेतली. पण हा उपाय तर वर्षातून एकदा करता येतो आणि तो दिवस काही कारणांनी चुकला तर काय ?मित्रांनॊ मानवी गरजा आणि त्याची पुर्ती कशी करायची यावर सगळ्यात जास्त उपाय आपल्या ऋषी मुनींनी केला आणि देवतांच्या आवाहनाचे विवीध प्रयोग त्यांनी शोधून त्याच्या आराधने द्वारे मानवी जीवन समृध्द करण्याचे मार्ग सांगीतले आहेत.आज आपण असाच एक उपाय पहाणार आहोत ज्याला वैभवलक्ष्मी व्रत असे म्हणतात. वैभवलक्ष्मी व्रत हे स्त्रीयांनी करायचे व्रत आहे, दर आठवड्याला शुक्रवारी करण्याचे व्रत आहे. ह्या व्रताचे प्रयोजन आहे आहे ती लक्ष्मी स्थिर करणे.अनेकांना खुप पैसे मिळतात पण पैसे मिळण्याचे मार्ग काही दिवसांनी बंद होतात. पैसे यायला लागले की खर्च ही वाढतात आणि पैसे यायचे बंद झाले की खर्च लगेचच बंद होत नाहीत ते चालूच रहातात. अनेकांना आशा असते की पैसे आज आले नाहीत तर उद्या येतील म्हणून लोक शिल्लक पैसे खर्च करतात. ते संपले की कर्ज काढतात. त्याच्या व्याजाच्या बोजाखाली दबतात.या लोकांच्या कडे लक्ष्मी स्थिर झाली नाही म्हणून हे त्यांचे दिवस येतात. आयुष्यात तुम्हाला किती धन मिळावे याचे गणित तुमच्या जन्माच्या आधी ठरले आहे. तुमच्या जन्मकुंडलीने त्याचा पडताळा घेता येतो. एखादा माणूस म्हणजे स्त्री किंवा पुरूष जन्माला आल्यावर तो किती धन कमवू शकतो हे समजते. अर्थात ते रुपयांमधे नाही समजले तरी याला चणचण भासेल की भासणार नाही. याचे शिल्लक धन किती असेल याचा अंदाज जन्मकुंड्ली द्वारे घेता येतो.जर आपल्याला पैसे किती मिळणार हे समजले आहेत आणि त्यात वाढ होणारच नसेल तर या वैभवलक्ष्मी व्रताचा काय फ़ायदा असे अनेकांना वाटेल. आत्ता पर्यंतच्या चर्चेवरुन जर जन्मकुंडलीवरुन पैसे किती मिळणार हे ठरलेले असेल तर या व्रताने खर्च करण्याच्या विचारांवर नियंत्रण येते आणि आहे ती लक्ष्मी स्थिर होते. एकदा पैसे म्हणजे काय हे समजले की अनाठायी व वायफ़ळ खर्च कमी होतात. असे झाले की आर्थिक संकटे येत नाहीत. संपुर्ण आयुष्यात मिळणारे पैसे आपल्याला पुरवून वापरण्याची ट्रीक आपल्याला सापडते. हे व्रत स्त्रीयांना का करायला सांगीतले आहे ? यामागे मोठ्ठा विचार आहे. पैसे कमवण्यासाठी पुरूष जितके कष्ट घेतो, विचार करतो तितके खर्च करताना करत नाही. ही जबाबदारी कमवती असो किंवा नसो स्त्रीकडे येते. खास करुन विवाहीत स्त्रीकडे येते. तिच्याकडे घर चालवण्याची पुन्हा पैसे येई पर्यंत सर्वांना जेवायला घालण्याची जबाबदारी येते. जे घर पैशा अभावी त्रस्त असते त्या घरातली स्त्री पैसे खर्च करताना विचार करत नाही. हा विचार आपल्या कुटुंबाला समजाऊन सांगत नाही असे बरेचदा दिसते. व्यसनापायी पैसे उडवणार्या पुरुषाला अडवणारी स्त्री नसेल तर हे घडायला वेळ लागत नाही. यासाठी आधी स्त्रीची खर्चाबाबतची बुध्दी स्थिर व्हावी यासाठी हे व्रत स्त्रीयांना खासकरुन विवाहीत आणि घरासाठी जबाबदार स्त्रीयांना करायला सांगीतले आहे.मला सांगायला आनंद होतो की माझी पत्नी न चुकता हे व्रत अनेक वर्षे दर शुक्रवारी करते. ती गुरुवारी घर जरा जास्त स्वच्छ करते. तिची भावना आहे की जिथे जळमटे तिथे लक्ष्मी येत नाही. शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीचा फ़ोटॊ पाटावर लाल वस्त्रावर मांडून त्याच्या समोर तांदूळ ठेऊन त्यावर ती एखादा सोन्याचा जिन्नस ठेवते. फ़ोटो ऐवजी यंत्र सुध्दा पुजेसाठी शुक्रवारी स्थापन केले तर चालेल. हे यंत्र अमेझॉन वर उपलब्ध आहे. https://amzn.to/2obmQKPहा फ़ोटॊ सुध्दा अमेझॉन वर उपलब्ध आहे https://amzn.to/2mxSwcOएक तेलाचा व एक तुपाचा दिवा लाऊन आणि गडवा भरुन पाणी भरुन ठेवते. मग पुजा सुरु होते. फ़ोटॊला व सोन्याच्या जिन्नसाला ती हळद, कुंक आणि लाल फ़ुल वहाते. हे सुध्दा आमच्या घरचे असते. यासाठी घरात लाल जास्वंद, लाल गुलाब याची झाडे बाल्कनीतल्या कुंडीत लावलेली आहेत. नैवेद्यासाठी पांढरे पेढे, खीर, बत्तासे किंवा साखरफ़ुटाणे विदर्भात याला चिरंजी म्हणतात याचा नैवेद्य दाखवल्यावर ती विष्णूदासांनी लिहलेली आरती लक्ष्मीची, वैभव सुख संपत्तीची ...... ही आरती म्हणते पाठोपाठ लक्ष्मी अष्टक म्हणते व नमस्कार करुन घरच्यांना प्रसाद देते. जर याच वेळी घरात कुणी सवाष्ण स्त्री आली तर तीला लक्ष्मीचे स्वरुप मानून हळद कुंकू लावते. तीलाही प्रसाद देते. नमस्कार करते.माझा अनुभव असा की ३१ वर्षांच्या आमच्या दोघांच्या संसारात आम्हाला आर्थिक संकटे आली नाहीत. याचे कारण या लक्ष्मी व्रताने आम्हाला वायफ़ळ खर्च करण्याची बुध्दी होत नाही. माझी पत्नी शुक्रवारी उपास करत नाही. ज्यांना हे व्रत नव्याने सुरु करायचे आहे त्यांनी सुरवातीला शक्य असेल तर ठरवून ११ किंवा २१ शुक्रवार उपास करावेत. याचा उद्देश इतकाच की उपाशी राहीले की शुक्रवारी संध्याकाळी पुजा करणे विसरत नाही. एकदा ह्या व्रताची महती समजली की उपास करण्याची आवश्यकता नाही. घरात पाहूणे येऊ देत किंवा अन्य काही पुजा विसरायची नाही. मासीक धर्माच्या वेळी हे व्रत मुलीला, पतीला किंवा अन्य ज्याचा विश्वास आहे त्या व्यक्तीला करायला त्या शुक्रवार पुरते सांगायचे.शुक्रवार संघ्याकाळ चुकू नये म्हणून ती त्या दिवशी संध्याकाळी घरातच असते. शक्यतो बाजारात जाणे, खरेदीला जाणे ही कामे शुक्रवारी करत नाही. ह्या व्रताचे उद्यापन नाही. जोवर हात पाय चालत आहेत तोवर हे व्रत करायचे. आजारपणात, बाळंतपणात खंड पडला तर पुहा सुरु करायचे. जन्मकुंडलीपेक्षा जास्त प्रभावी काय आहे तर गुणसुत्रे, इच्छाशक्ती आणि संस्कार. वायफ़ळ खर्च टाळणे ही इच्छाशक्ती सुध्दा आहे आणि संस्कार सुध्दा आहे. दरवेळा खर्च टाळणे म्हणजे मन मारणे असे नाही. आवश्यक तो खर्च करायला पाहीजे. पण अनावश्यक टाळायला पाहीजे.इतके केले तरी लक्ष्मी प्रसन्न होते. स्थिर होते आणि खरच गरज असते तेंव्हा पैसे हाताशी रहातात. ज्यांना वैभवलक्ष्मी व्रत सुरु करायचे आहे त्यांनी वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक आणून या व्रताला आरंभ करावा आणि या व्रताच्या महतीचा लाभ घ्यावा.अशी एक नाही हजारो पारंपारीक उपाय भारतात अनेक पिढ्या प्रचलित आहेत. अनेकांनी याचा लाभ घेतलाय. यातील निवडक व्रतांची, उपायांची माहिती मी आपल्या गायत्रीमाताज्योतिषकेंद्र संचालीत ब्लॉगवर देणारआहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!