आपल्या मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? उपाय रुक्मिणी स्वयंवर

By gmjyotish on from https://gmjyotish.blogspot.com

हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो आणि मुलांचा विवाह लांबलेला आहे म्हणून काळजीत असलेले पालक हो तसेच उपवर विवाह इच्छुक मुलांनो.मी युट्युबर वर विवाह विषयावर १२ व्हिडिओ तयार केलेल्या आहेत. ज्यांनी आजपर्यंत पाहीलेल्या नसतील तर जरुर पहा. या सर्व व्हिडिओ पहाण्यासाठी ही प्ले लिस्ट पहा.https://www.youtube.com/watch?v=jeudC2mcU7U&list=PLp4n_ZhOiRoVWxg6qz5GvgbQLm9sv7N1Mमुलांचा विवाह वेळेवर व्हावा म्हणून मी सहा उपाय सांगीतले आहेत. यातील चार मुख्य उपाय आहेत तर दोन उपाय हे मुख्य उपायाला पुरक ( सपोर्टींग ) उपाय आहेत. हे मुख्य उपाय खालील प्रमाणे.१) रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे संपुटयुक्त १८ पारायणे - याची व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=0VTG22kFw_0&t=80s२) ब्रह्मणस्पती सुक्त हवन याची - व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=TKmeL3ybpKE३) श्रीगजानन विजय ग्रंथाचे संपुटयुक्त ३ पारायणे - याची व्हिडीओ पहाhttps://www.youtube.com/watch?v=PtzSi4_QQ-w&t=56s४) कात्यायनी पुजन येणार्या ३ अक्टोंबर २०१९ ला करा - याची व्हिडीओ पहाhttps://www.youtube.com/watch?v=FnNrQj1pVMs&t=10s५) हळकुंडे प्रयोग ( पुरक उपाय )- याची व्हिडीओ पहाhttps://www.youtube.com/watch?v=2FTRRVe2WDs&t=138s६) ओपल उपरत्न वापरणे ( पुरक उपाय ) - याची व्हिडीओ पहाhttps://www.youtube.com/watch?v=pCiLlhjOU34नुकतीच १७ सप्टेंबर २०१९ ला अंगारिका चतुर्थी होऊन गेली. आता नजदिकच्या काळात अंगारिका चतुर्थी नाही. येणार्या २०२० मधे अंगारिका चतुर्थी नसल्यामुळे साल २०२० मधे एका दिवसात होणारा  ब्रह्मणस्पती सुत्र हवन हा प्रयोग करता येणार नाही. ज्यांचा विवाह लांबला आहे अश्या उपवर विवाहइच्छुक मुलांना येणार्या वर्षात रुक्मिणी स्वयंवर पारायण , श्रीगजानन विजय पारायण किंवा कात्यायनी पुजा या वर्षातून फ़क्त दोनदा करता येणार्या उपायावर अवलंबुन रहावे लागणार आहे.रुक्मिणी स्वयंवर हा उपाय मी दोन व्हिडीओ च्या माध्यमातून सांगूनही मला पुन्हा पुन्हा या विषयावर प्रश्न विचारले जातात. या साठी ही पोस्ट मी तयार करतो आहे.रुक्मिणी स्वयंवर हा उपाय पारंपारिक आहे. विवाह होण्यासाठी अडचणी येत असतील तर उपाय म्हणून महाराष्ट्रात परिचीत आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचन हे तप आहे. हे तप केल्याने आपल्या जन्मकुंडली मधील दोष नाहीसे होऊन विवाह जमणे शक्य होईल.  रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी साधारण ४५० वर्षांपुर्वी लिहलेला आहे. हा मुळ ग्रंथ अत्यंत रसाळ आहे.रुक्मिणी स्वयंवर हे पुस्तक मागवण्यासाठी ही लिंक वापरा. https://www.amazon.in/gp/product/B07B8VYC7X/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=3638&creative=24630&creativeASIN=B07B8VYC7X&linkCode=as2&tag=nitinjoglekar-21&linkId=681900d29554b257ddcec60921f6da78शास्त्र असे सांगते ( उतरार्थ ) या वेदवाणी प्रकाशनाच्या पुस्तकामधे हा उपाय म्हणजे १८ पारायणे सुरु करण्यापुर्वी करायचा  संकल्प आहे. संकल्पाशिवाय कोणतीही पुजा किंवा तप फ़लदायी होत नाही. यासाठी सर्वप्रथम आपण संकल्प करणे आवश्यक आहे.हे पुस्तक विकत हवे असेल तर त्याची ऑन लाईन मागवण्यासाठीची माहिती इथे आहे.Shastra Ase Sangte ( Utaradha ) -   https://amzn.to/2NQixzfयाप्रमाणे संकल्प करण्यासाठी वेदवाणी प्रकाशनचे हे पुस्तक विकत घ्या. यातील संकल्प वाचून ते संस्कृत आत्मसात करा किंवा आपल्या परीचयाच्या संस्कृत वाचू शकणार्या व्यक्तीकडून संकल्पाचे उच्चारण कसे करायचे समजून घ्या. यामधे ज्या दिवशी हा संकल्प करणार त्या दिवसाचे नक्षत्र कालनिर्णय पाहून योग्य ठिकाणी म्हणा.थोडक्यात संकल्पाला खुप महत्व आहे. संकल्पामधे हातात पाणी घेऊन हे संकल्पाचे ते वाक्य संपल्यावर हातातील पाणी सोडणे  हे तंत्र आहे. यामुळे हा संकल्प आपण विसरत नाही. संकल्पाप्रमाणे सगळी पारायणे पुर्ण झाल्यावर त्याचे कालांतराने फ़ळ मिळते. शास्त्र असे सांगते या पुस्तकात पान १०० वर दिल्याप्रमाणे हे करा. यासाठी कोणताही पर्याय नाही.अनेक पालकांनी आमची मुलगी किंवा मुलगा मराठी मिडीयम मधे शिकलेला नाही. त्यांना ही मराठी पोथी मधील शब्द उच्चारता येत नाहीत. मराठी नीट वाचता न आल्यामुळे वेगाने वाचता येत नाही यासारखे सारखे प्रश्न पालकांनी विचारल्यामुळे मी एक पर्याय घेऊन आलो आहे.संकल्पाचे वाचन झाल्यावर पुजा झाल्यावर , पोथीचे पुजन झाल्यावर पहिल्या दिवशी करायचे वाचनाची म्हणजे सातवा अध्याय, पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि सातवा  जर युट्युब वर ऐकायला मिळाला तर पोथी वाचन सोपे होईल. कानाने ऐकायचे, डोळ्यांनी वाचन करायचे आणि त्याप्रमाणे उच्चार करायचे. असे केले तर वाचन सोपे होईल असे वाटते.१ ते १८ अध्यायांच्या १८ व्हिडीओ करण्यासाठी मी धार्मिक प्रकाशनाची पोथीचा उपयोग केला आहे. आपणही याच प्रकाशनाची पोथी घ्यावी. उद्देश असा की विवीध प्रकाशनाच्या पोठीमधे काही पाठभेद म्हणजे वेगळे शब्द जर आलेले असतील तर यामुळे जे ऐकतो आहे ते आणि जे वाचतो आहे त्यात फ़रक असू नये.हा उपाय करणार्या उपवर मुलांनी हे लक्षात ठेवावे की टी.व्ही पहाताना, प्रवासात, कानाला युट्युब इयर फ़ोन लाऊन ही पारायणे करणे याने अपेक्षीत फ़ळ मिळणार नाही. अंघोळ करुन शुचीर्भूत होऊन , पोथी समोर ठेऊन कानाला फ़क्त वाचन सोपे व्हावे म्हणून हेडफ़ोन लाऊन हे वाचन करायचे आहे. शास्त्र असे सांगते मधले वाचनाचे कोणतेही नियम शिथील केलेले नसून फ़क्त पोथीतील आज प्रचलीत नसलेले शब्द उच्चार सोपे व्हावे हा उद्देश आहे. थोडक्यात कानाने रुक्मिणी स्वयंवर हेडफ़ोन लाऊन ऐकणे, त्याच वेळी डोळ्यांनी वाचणे आणि तोंडाने बोलणे किंवा ते शब्द उच्चार करणे यामुळे जी एकाग्रता होईल अशी एकाग्रता ह्या तपाचे फ़ळ मिळवण्यासाठी उपयोगी आहे.आपल्या सोयी साठी पहील्या दिवसाचे रुक्मिणी स्वयंवर वाचन ७-१-२-७ याची प्लेलीस्ट इथे आहे त्याची लिंक खाली डिस्क्रीप्शन मधे येईल या प्रमाणे नऊ प्ले लीस्ट तयार करण्यात येतील ज्यामुळे हे १८ अध्यायांच्या व्हिडीओ पैकी ७-१-२-७ हे व्हिडीओ आपल्याला शोधत बसण्याची आवश्यकता नाही. या प्रमाणे जर आपण वाचन केले तर वाचन करणे सोपे होईल.आपण फ़क्त या एका व्हिडीओची लिंक आपल्या मोबाईलवर ठेवायची किंवा ९ लिंक कॉपी करुन आपल्या कडे ठेवल्या तर त्या दिवसाचे वाचन शोधणे सोपे होईल.आपल्या सोयी साठी मी प्रत्येक दिवसाच्या  वाचनासाठी किती वेळ लागतो हे या व्हिडीओ मधे लिहून देत आहे.पहिल्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१-२-७ https://www.youtube.com/watch?v=wNuEH-233tc&list=PLp4n_ZhOiRoWe-sbjVjKIvu7i6m-JZGBKदुसर्या दिवसाचे वाचन अध्याय ७-३-४-७  https://www.youtube.com/watch?v=wNuEH-233tc&list=PLp4n_ZhOiRoUoXHogfM_ylrkDdh0foZPUतिसर्या दिवसाचे वाचन अध्याय ७-५-६-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoVj8iQAmdaxq9tN8G7O-XeKचवथ्या दिवसाचे वाचन अध्याय ७-७-८-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXBXnkt0BAleOF1zjq6abIKपाचव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-९-१०-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXO50XmY_XEhfMmuaIt7-aUसहाव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-११-१२-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoUB2l9gNRe_3FtYJFjN-R5aसातव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१३-१४-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoUASojevD37Foa_8XHIWQYHआठव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१५-१६-७   https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXbDNsvpov9epEjp1GA_xDrनवव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१७-१८-७   https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoV5IumW4wwx8WI7utRmfJO6इतका वेळ आपण आपल्या दिवसभरात काढून दिवसभराचे वेळापत्रक आखू शकाल. थोडक्यात मराठी वाचायला वेळ लागतो यासाठी हे वाचन न लांबता इतक्या वेळात पुर्ण होते हे समजले की आपण नोकरी करत असाल तर वेळापत्रक बिघडण्याचे कारण रहाणार नाही.यापुढे जाऊन हे वाचन करताना आपल्याला काय अडचणी येत आहेत ते कळवा म्हणजे त्या अडचणींवर कशी मात करायची हे समजेल. व त्यावर पर्याय शोधून काढता येईल.आपल्याला हा संकल्प यशी रित्या पुर्ण होण्यासाठी शुभेच्छा आणि विवाह व्हावा यासाठी सुध्दा शुभेच्छा आणि शुभाअशिर्वाद
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!