अभिव्यक्ति इंडिया : कला जगत : भाग ६ : हॉटेल रवांडा
By patwardhan on मनोरंजन | चित्रपट | चित्रपट परीक्षण from abhivyakti-india.blogspot.in
“एकीचे बळ” असा नारा देत माणूस समूहाने राहू लागला. अडचणींचा सामना करत जगणं सोपं व्हावं म्हणून समाजाची निर्मिती झाली. भावनिकदृष्ट्या प्रबळ होऊन जगण्यास तेवढाच हातभार. आपण कुठल्यातरी साच्यात बसायला हवे हा अट्टाहास. जगाच्या नकाशावर मी भारतीय एवढीच काय ती ओळख. मी माझ्या देशात कुठेही गेले कि मी अमुक एका राज्याचं प्रतिनिधित्व करते. देशपातळीवर माझ्या धर्माचा विचार केल्या जातो. धर्माची गणितं अगदी सहज चुटकीसरशी सोडवली जातात. आपण अपना पराया हा भेद उघड करू लागतो. मी माझ्या राज्यात हिंडूफिरू लागले तेंव्हा विभाग, जिल्हा आणि सरतेशेवटी माझ्या मुळ गावापर्यंत येऊन ठेपते. गावाच्या वेशीपासून आत प्रवेश केल्यानंतर माझी जात ही माझी ओळख. आपली ओळख कितीही पुसता यावी म्हणून प्रयत्न केला तरी तो तोकडा ठरतो. आपली ओळख जोपर्यंत कुणास ठेस पोहचवत नाही तोपर्यत सगळे आलबेल असते पण जेंव्हा ह्या भेदाची झळ बसते तेंव्हा आपल्याला ही तकलादू ओळख नकोशी वाटते.