अनुभूती
By Ramesh on कविता from www.rameshthombre.com
तुझं हळूच कुशीत शिरणं, रजईशी खेळणं, नाक, डोळ्यांचं चुंबन घेणं, कधी दोन्ही पाय अंगावर टाकणं,ओठातल्या ओठात पुटपुटणं….अन माझी जराशीच मान वळली,दुर्लक्ष झालं कि ...."माझ्याकडं बघा ना !" असं हक्कानं सांगणं,आता चांगलच अंगवळणी पडलंय !पुन्हा एकदा बालपणाची अनुभूती….किती सुखद असते नाई ?- रमेश ठोंबरे(अनुभवसाठी…. )www.rameshthombre.com