अद्वितीय अनुभव .....: ब्लॉग - लेख - उत्तर कोरिया - मीमांसा
By bhagwatblog on ललित from https://bhagwatbalshetwar.blogspot.com
एखादा गुंड किंवा द्वाड मुलगा जो प्रत्येक अरे ला कारे करतो आणि कारण नसताना धिंगाणा घालतो अचानक तो जर समजूतदारपणे वागायला लागला तर आपल्याला नवल वाटते. त्या कडे आपण संशयाने पाहतो. असेच काहीसं "किम जोंग-अन" या उत्तर कोरियाच्या हुकूमशहा बद्दल झाले आहे. मी काही आंतरराष्ट्रीय घडामोडीचा जाणकार नाही पण या घटनेकडे एक सामान्य व्यक्तीच्या नजरेतून बघतो. मागील काही महिन्यांपासून हुकुमशहाचा कल बघितल्यास आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.