|| महाराष्ट्राची शोधयात्रा ||: नैसर्गिक डाईक रचनेची कातळभिंत 'तैलबैला'
By maharashtrachishodhyatra on भटकंती | निसर्ग from www.maharashtrachishodhyatra.com
महाराष्ट्राला मुळातच नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात लाभलेले आहे. या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालणारे डोंगर, नद्या, किल्ले, लेणी, मंदिरे ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात भटक्यांना आकर्षित करतात अशीच काही महत्वाची भौगोलिक आश्चर्य देखील महाराष्ट्रात आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पहिले नाव घेतले जाते मावळामध्ये सुधागडच्या अगदी तोंडावर आणि घनगडाच्या समोर एका तटस्थ पुराणपुरुषाप्रमाणे लाखोवर्षे उभ्या असलेल्या 'तैलबैला' या नैसर्गिक डाईक रचनेच्या कातळभिंतीचे.